मुंबईतील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा दस्ताऐवज २४ नोव्हें पर्यंत सादर करा

मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत, त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले.

मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १३ ऑक्टोबर १९६७ या कालावधीतील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावे, वंशावळ, शैक्षणिक व महसुली पुरावे, जुन्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास अशा नागरिकांकडून याबाबतचे उपलब्ध अभिलेख मुंबई जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील नियोजन भवन येथे २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पांढरे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी ०२२-२२६६४२३८ किंवा gadmumbaicity@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *