२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई

रेशनिंग विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास शिधावाटप भरारी पथक आणि पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २० हजार लिटर डिझेलसदृश अवैध पेट्रोलियम पदार्थासह टँकर जप्त करण्यात आला असून सुमारे ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप विभागाच्या मार्फत  देण्यात आली आहे.

१६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास एमएच-46-सीयू-7536 क्रमांकाचा टँकर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात डिझेलसदृश पेट्रोलियम पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनियंत्रक शिधावाटप, फ परिमंडळ ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोपरी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने तपासणी मोहीम राबविण्यात आली.

तपासणीदरम्यान संबंधित टँकर अडविण्यात आला असता त्यामध्ये सुमारे २० हजार लिटर इतका पेट्रोलियम साठा आढळून आला. या साठ्याबाबत वैध कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने हा माल बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ कारवाई करत टँकरसह संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय, फ परिमंडळ ठाणे व कोपरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे.हायके एएस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *