राज्यातील ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र आगामी हप्ता मिळणार नाही

राज्यातील लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतून दरमहा दिड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रथम ही योजना सुरू केली त्यावेळी सरसकट सर्व १८ ते ६५ वयोगटातील बहिणींना सरकारने माहे दिड हजार देण्याचे धोरण आखले त्याचा गाजावाजा भरपुर झाला. पण तिजोरीवर ताण येताच सरकारने छाननी सुरू केली. या योजनेचा लाभ काही अपात्र महिलाही घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. अंतिम पडताळणी नंतर ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता या महिलांना आगामी हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर ६६ लाख महिला अपात्र ठरल्यानंतर आता राज्यात फक्त १ कोटी ७७ लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता या महिलांनाच १५०० रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आता ६६ कोटी महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहेत.  मात्र अपात्र असताना लाभ घेतलेल्या या महिलांवर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात या महिलांना दिलासा मिळणार आहे.

अंतिम पडताळणीपूर्वी राज्य सरकारला या योजनेसाठी ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च येत होता. मात्र आता तब्बल ६६ लाख महिला अपात्र ठरल्यामुळे महिन्याला आता या योजनेवर २ हजार ६५५ कोटी खर्च होणार आहेत. या पडताळणीनंतर सरकारचे वर्षाला १ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. याचाच अर्थ या पडताळणीनंतर आता सरकारला आर्थिक फायदा होणार आहे. मात्र यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची सर्वात यशस्वी योजना म्हटले जाते या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता या लाखो लाडक्या बहि‍णींना आता दिड हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही. योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली. यात अपात्र ठरलेला महिलांना आता निधी मिळणार नाही. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होणार आहे.

About Editor

Check Also

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

“सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *