राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो…

ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो… पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे – फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी… गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते… स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके… ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून गेला.

महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणार्‍या शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी युवकांनी फलक दाखवून आणि घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *