राज ठाकरे म्हणाले; कोणी येवू नका, मी कोणाला भेटणार नाही कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून ट्विट करत केले आवाहन

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जूनला वाढदिवस असला तरी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोणालाही भेटणार नसून कोणी भेटण्यासाठी येऊ ही नये असे आवाहन करणारी एक ऑडिओ पोस्ट दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी आज ट्विट केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या सभेचा उल्लेख करत मनसैनिकांना त्यांच्या शस्त्रक्रियेचे आठवण करून दिली. त्यांनी आपल्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचंही नमूद केले.
ऑडिओ क्लिपद्वारे राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं.
असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल आणि बरं वाटायला लागेल तेव्हा मी आपणा सर्वांना निश्चित भेटेन. त्यामुळे १४ जूनला आपण कोणीही घरी येऊ नये ही विनंती.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे केले आवाहन

महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *