नवनीत राणा तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर झाल्या लीलावतीत दाखल पाठीच्या दुखण्यामुळे अॅडमीट झाल्याचे सांगण्यात येतेय

जवळपास १२ दिवस तुरुंगात राहील्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जामीन मिळाल्यानंतर एक दिवस उशीरांना त्यांची भायखळा येथील कारागृहातून सुटका झाली. त्यांनंतर थेट वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून स्वतःची तपासणी करून घेतली. तुरुंगात साध्या पध्दतीने राहिल्याने त्यांना पाठीच्या दुखण्यात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ही उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर, तुरुंगात गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं काल बुधवारी जामीन मंजूर केला. त्यानंतर आज गुरुवार खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका झाली. मात्र प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात गेल्या.

न्यायालयाच्या आदेशानुसार हनुमान चालिसा प्रकरणी कोणतेही वक्तव्य करायचे नाही अशी अट न्यायालयाने नवनीत राणा यांना घातली आहे. त्यामुळे नवनीत राणा या कारागृहातून बाहेर पडल्यानंतर माध्यामांना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच गाडीतूनच त्यांनी हात जोडून नमस्कार करत त्या तशाच पुढे निघून गेल्या.तर, त्यांचे पती आमदार रवी राणा हे तळोजा कारागृहात असून त्यांच्या सुटकेची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे.
राणा दाम्पत्य मागील बारा दिवसांपासून तुरुंगात होतं. त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य करत त्यानंतर त्यांनी विविध अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला.

About Editor

Check Also

Rahul-Gandhi-Protest

राहुल गांधी म्हणाले, मला फरफटत ओढून नेताना पोलिस कुजबुजत होते, सरकारला हटवा शिक्षण व्यवस्थेत हेराफेरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या अचानक झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलीस ओढत नेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *