मंत्र्यांनो कॉलेज, शाळांमध्ये कधी अभ्यास केलाय का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मंत्र्यांना मिश्किल सवाल

मुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा अहवाल मागितला अभ्यास सुरु आहे, धनगर समाजाचा अहवाल विचारला तर मंत्र्यांचा अभ्यास सुरु असल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिले जाते. सभागृहात असलेल्या मंत्र्यांनी शाळा, कॉलेजात कधी अभ्यास केलाय का? असा मिश्किल सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पणन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेत विचारला.

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकत्रित मांडण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीवरील २९३ खालील प्रस्तावावर आपली भूमिका मांडताना त्यांनी वरील मिश्किल सवाल केला.

धनगर समाजाचा अहवाल टीस या संस्थेकडून राज्य सरकारला सादर करून दिड महिना झाला. मागील दिड महिन्यापासून या अहवालाचा अजून अभ्यासच सुरुच आहे. तो अहवाल आम्हालाही द्या आम्ही मंत्र्यांप्रमाणे अभ्यास करू असा चिमटाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांनी काढला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *