वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल शिकवू नये.

विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या व विद्यार्थी व विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही राजकारभार करत आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करणाऱ्या भाजपाने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणे म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ असा प्रकार असून भाजपा, नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा खरा चेहरा देशातील जनतेने ओळखला आहे, त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गरळ ओकून भाजपाला आपले महापाप लपवता येणार नाही, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

यावेळी भजपाचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई भाजपाचा अध्यक्ष अमित साटम हा इसम अत्यंत विकृत मानसिकतेचा आहे, हे त्याच्या आधीच्या अनेक प्रकरणातून त्याने दाखवून दिले आहे. सामान्य जनेतला अत्यंत शिवराळ भाषेत शिवीगाळ करणारे व्हिडीओ मुंबकरांनी पाहिले आहेत. मुंबईत अतिवृष्टी व बीएमच्या भोंगळ कारभारामुळे झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा तर एका व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला, त्यावर हा इसम फिदीफिदी हसत असताना जगाने पाहिले आहे. आज या इसमाने राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना गांधी नेहरुंचा वारसा आहे, सर्वात जुन्या पक्षाचे ते नेते आहेत तसेच त्यांचे उच्च शिक्षण झाले असून ते सुसंस्कृत आहेत, अमित साटम सारख्या टिनपाट व्यक्तीची त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही. राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी भाजपा सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला का केला, मुलींचे कपडे फाडले, अमानुष अत्याचार केले, त्याचे उत्तर द्यावे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांना साथ देणाऱ्या रा. स्व. संघाच्या दावणीतील अमित साटमने काँग्रेस व राहुल गांधी यांना देशभक्ती शिकवू नये, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुंबई काँग्रेसचे लोकभवनवर आंदोलन..

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांना दिल्ली पोलिसांनी अटक केली तसेच विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला, त्याविरोधात मुंबई काँग्रेसने लोकभवन समोर आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, केतन शाह, अर्शद आझमी, भावना जैन,  राजपती यादव, नगरसेवक हैदर अली शेख, अजंता यादव, वखार खान जिल्हा अध्यक्ष भावना जैन, राजेश शर्मा, अवनीश सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसींनी या सर्वांना अटक करून रात्री उशिरा सोडून दिले.

सुरेशचंद्र राजहंस,

प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक, मुंबई काँग्रेस.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *