फडणवीसांच्या आरोपामुळे जनाब राऊत बावचळले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील सुपर मार्केट आणि १००० चौरस फुट क्षेत्रफळाच्या दुकानातून वाईन विक्रीस परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचा सिलसिला अद्यापही सुरु असतानाच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र फडणवीसांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने थेट शिवसेना प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांच्यावर बा‌वचळल्याची खोचक टीका करत त्यामुळेच त्यांच झिंग झिंग झिंगाट झाल्याचा टोला लगावला.

राज्यात वाईन विक्रीला परवानगी देण्याआधी वाईन कंपन्यांबरोबर परदेशात बैठका घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर काल केला होता. त्यावरून आज सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर टीका केली. त्यापार्श्वभूमीवर पडळकर यांनी व्हिडिओ जारी करत शिवसेनेवर टीका केली.

जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट‘ झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला

जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का? की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही असे आवाहनही त्यांनी केले.

शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खुप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत असा दावाही त्यांनी यावेळी केला.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *