एम्स मधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ गॅमा ब्लड इरॅडिएटर उपकरणाचेही उद्घाटन

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एनएटी ही रक्त, लाळ किंवा इतर नमुन्यातून रोगजंतू त्वरेने शोधणारी चाचणी आहे. या चाचणी द्वारे एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी या सारख्या गंभीर आजारांचे निदान प्राथमिक अवस्थेतच होऊन संबंधित रुग्णावर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात. अचूक निदान हे या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे उपकरण रक्तपेढ्यांमध्ये लावल्यास गरजू रुग्णांना दूषित रक्त देण्याचा धोका जवळपास संपतो. गॅमा ब्लड इरॅडिएटरद्वारे अतिशय शुद्ध रक्त गरजू रुग्णांना मिळू शकते. रक्त संक्रमणातून होणारे आजार या उपकरणामुळे रोखले जातात.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. प्रारंभी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे यावेळी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी, एम्स मधील रक्त संक्रमण विभाग प्रमुख डॉ. सौम्या दास, डॉ. पराग फुलझेले, डॉ. रौनक दुबे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *