लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्जः खा. अशोक चव्हाण सलग तीन दिवसांच्या मॅराथॉन बैठकीत मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला

मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून संपूर्ण ताकतीनिशी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज आहे असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, गुरुवार दि. १५ नोव्हेंबर रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र, दि. १६ नोव्हेंबर २०१८ विदर्भ व उत्तर महाराष्ट्र व शनिवार दि. १७ नोव्हेंबर रोजी कोकण विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह व काँग्रेस पक्षाने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता. संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र आहे. जनतेच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार येईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका

राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *