भाजप खुशीत तर काँग्रेस कोमात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे सुपुत्र सुजय यांचा अखेर भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने एकापक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उंडी मारणाऱ्या आयाराम-गयारामांची सुरुवात झालेली आहे. मात्र या यादीत आता काँग्रेसचे विधानसभेतील विरोदी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांचे नाव समाविष्ट झाले असून त्यांचा आज मंगळवारी भाजपमध्ये औपचारीक प्रवेश केला. त्यामुळे भाजप जोशात तर काँग्रेस कोमात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित सुजय विखे-पाटील यांनी प्रवेश केला.
काँग्रेसकडून एकाबाजूला भाजपशी राजकिय लढा सुरु असून या लढ्यात अनेकांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. त्यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यत समविचारी पक्षांशी युती करण्याचे प्रयत्न काँग्रेस श्रेष्ठींकडून करण्यात येत आहेत. परंतु महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचेच सुपुत्र सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधात बंड पुकारत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या विजयाला काँग्रेसमधूनच हातभार लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, सुजयच्या निमित्ताने काँग्रेसच्या मातब्बर नेत्याच्या मुलाला भाजपमध्ये आणण्यात यश आल्याने भाजपमध्ये जोश निर्माण झाला आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसमध्ये निवडणूकीपूर्वीच कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *