शिकाँरासाठी स्वाभिमानी, समाजवादी आणि रिपाई-कवाडे पक्षाला विश्वासात घेणार काँग्रेस पक्षाध्यक्षा गांधींच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती

नवी दिल्लीः प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबधित चर्चा झाली असून या दोन्ही पक्षांच्या आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेतकरी स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पार्टी रिपाई-कवाडे गट यांना पुढील रणनीतीच्या अनुषंगाने विश्वासात घेतले जाणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याबाबतची भूमिका राज्यातील जनतेला जाहीररित्या सांगण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्याबरोबरील बैठकीच्यावेळी काँग्रेस नेते सी.पी.जोशी, ए.के.अॅन्टनी आदी उपस्थित असल्याचे त्यांनी सोनियां गांधी यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या गोंधळावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबरोबरच इतर प्रश्नांवर त्यांची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पुढील रणनीतीच्या अनुषंगाने उद्या अर्थात मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्याबाबतचा अहवाल ते पक्षाच्या श्रेष्ठींना सादर करतील असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा यांच्याबरोबर चर्चा झाली का अशी विचारणा पत्रकारांनी केली असता ते म्हणाले की, अशी कोणतीही चर्चा गांधी यांच्याशी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *