काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीरः यादी पहा संघटन सृजन अभियानांतंर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून नियुक्त्या

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात पक्ष संघटना बांधणीवर भर देत संघटन सृजन अभियान हाती घेतले असून या अभियातून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याच अभियानाच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात ब्लॉक अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया राबिवली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे.
राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत करणे, काँग्रेसचा विचार तळागाळात, गावपातळीपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी संघटना बांधणीवर भर देण्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मानस आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात काँग्रेसचा विचार रुजवणे हे महत्वाचे काम हे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्ष करतील. देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी करत असलेला संघर्ष अधिक बळकट करण्यासाठी हे नवे शिलेदार सर्वशक्तीने व एकजुटीने उभे राहतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला असून सर्व नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांना पुढील कामास शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांची यादी खालील प्रमाणे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *