सरपंच, उपसरपंचांची निवड होणार, पण ग्रामसभा नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला करत ग्रामसभा घेण्यास त्यांनी परवानगी नाकारत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधित कामकाज आहे, त्या टप्प्यावर स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने १७ मार्च २०२० रोजी आदेश दिले होते. तथापि, राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आधीच्या सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातून याबाबत विचारणा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, यासाठी संबंधीत तहसीलदारांना निर्देश देण्यात यावेत व सरपंच, उपसरपंच पदांची निवड करण्यात यावी असे कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात ग्रामसभा घेण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याची त्यांनी शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, व्यावसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज अमराठी ड्रायव्हरंना मराठी भाषा शिकविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *