कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे सोने ताब्यात घ्यावे असे आवाहन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
लॉकडाऊनमुळे देशातील कामगार, शेतकरी, असंघटीत कामगार, उद्योजकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी २१ लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली.
त्यानंतर सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी मागणी त्यांनी पुन्हा केंद्राकडे केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, कर्जत भीमाशंकरचा प्रकल्प उद्योगपतीच्या भल्यासाठी, विकासाला नाही विनाशाला विरोध महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले? ते आधी सांगा व नंतर लाखो वृक्ष लागवडीचे बोला

कर्जत भिमाशंकर भागात होणारा टोरंटचा प्रकल्प हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करणारा आहे. विकासाला कोणाचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *