राज्यसभेसाठी मनसे कोणाला करणार मतदान? शेलार यांनी केला खुलासा आमदार राजू पाटील भाजपाला मतदान करण्याची शक्यता

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून सहाव्या जागेसाठी आपल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मनसेचे मत मिळावे यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जाऊन भेट घेतली.

महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मतं फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील नेमकं कोणाला मतदान करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.

मनसेचे आमदार भाजपालाच मतदान करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आता त्यावर शिकामोर्तब झाला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे राज्यसभा निवडणुकीत भाजपालाच मतदान करतील, हे स्पष्ट झालं आहे. शेलार यांनी याबाबतची माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, पक्षाच्या वतीने येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये मनसेचे मत भाजपाला मिळावे यासाठी मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले. त्यामुळे मत आम्हाला पडणार असल्याने आमचा विजय आणखी सोपा आणि सुकर होणार आहे.

आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले आमदार राजू पाटील यांना बोलावून घेतलं असून भाजपाला मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्या मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपाने ही संधी साधली.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *