देशात मंदी असताना मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करण्यात मश्गुल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
देशात १०० टक्के आर्थिक मंदी असताना देशाचे पंतप्रधान मोदी जाहिरातीवर पैसे खर्च करून सरकारचे १०० दिवस साजरे करण्यात मश्गुल आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. मोदी सरकारचे १०० दिवस यावर बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
देशातील लोकांच्या नोकर्‍या जात आहेत. जीडीपी ५ टक्क्यावर आला आहे. लहान- लहान कंपन्या बंद होत आहेत. या आर्थिक मंदीवर उपाययोजना करण्याऐवजी सरकारचे १०० दिवस कसे गेले यावर जाहिराती करत आहेत असा आरोपही  त्यांनी केला.
देशावर आर्थिक मंदी का आली? देशावरील कर्ज ५२ लाख कोटीच्यावर जावून ८४ लाख कोटी कसे झाले? देशावर आर्थिक संकट असताना रशियाला ७२ हजार कोटी कसे काय दिले? ही भाजप सरकारची १०० दिवसातील कामगिरी असून याचंही उत्तर मोदींनी जनतेला दिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, व्यावसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज अमराठी ड्रायव्हरंना मराठी भाषा शिकविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *