शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

नागपुर: प्रतिनिधी

राज्यातील शाळांमध्ये पट पडताळणी झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्ट अधिकारी-शिक्षकांवर कारवाई केली की, मॅटमध्ये जातात. संस्थाचालक, शिक्षक आणि अधिकारी यांची एक टोळीच राज्यात कार्यरत असून त्यांची सर्वकष चौकशी करून त्याची पाळेमुळेच खोदून काढणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून भाजपचे आमदार ना.गो.गाणार यांनी राज्यात अतिरीक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदे भरण्यास बंदी असताना २० टक्के अनूदान देण्यास पात्र असताना १०० टक्के देण्यात आले. या प्रकरणी मोठा भष्टाचार झाल्याचे सांगत, लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत नागपुर विभागात भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

यास उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, नागपुर विभागात मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु कार्यवाही केली तर अधिकारी कायद्यातील पळवाटा शोधतात किंवा मॅटमध्ये जातात.

त्यावर गाणार यांनी या विभागातील शिक्षणाधिकारी, महेश करंजावकर आणि कारकून सुनिल ढोले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी गाणार आणि राष्टवादीचे सदस्य विक्रम काळे यांनी केली.

यावर मंत्री तावडे यांनी कोणी कितीही मोठा असो या विभागात नागपुर ते पुण्यापर्यंतचा अधिकारी शोधून काढून कार्यवाही करून भ्रष्टाचार निपटून काढणार असल्याचे स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, व्यावसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज अमराठी ड्रायव्हरंना मराठी भाषा शिकविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *