राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकिय पक्षाकडून आपलाच उमेदवार निवडूण यावा यासाठी सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपाच्या आशिर्वादाने अडिच वर्षापूर्वी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. येथील प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान देत मागील अडीच वर्षात काय केले याची चर्चा समोरासमोर येऊन करा असे आव्हान दिले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीने मागील अडीच वर्षात काय केले आणि आम्ही काय केले याची चर्चा समोरा समोर करायला तयार असल्याचे सांगत मात्र विरोधक चर्चा करायला तयार नाही. कारण त्यांनी अडीच वर्षात काही केलं नाही अशी टीकाही यावेळी केली.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली. राज्यात स्थगिती सरकार होतं. त्यावेळी मंदीर, प्रार्थना स्थळेही बंद केली होती. परंतु महायुतीच्या सरकारने सगळी मंदीर उघडली. तसेच स्थगिती दिलेल्या योजना पुन्हा सुरु केल्याची टीकाही यावेळी केली.
महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी आमचा वचननामा जाहिर चोरून त्यांचा जाहिरनामा प्रकाशित केला असून कॉपी पेस्ट केलेला जाहिरनामा बनवता येत नाही अशी खोचक टीका करत महायुतीचा जाहिरनामा म्हणजे फक्त ट्रेलर असून संपूर्ण सिनेमा यायचा अद्याप बाकी आहे. आम्ही लाडकी बहिण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रूपये केले. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेत शेतकरी सन्मान योजनेचा निधीही वाढवित प्रत्येकाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी निर्णयाच्या माध्यमातून प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya