निवडणूक आयोगाची शिवसेना शिंदे गटाला आणि भाजपाला कायदा उल्लंघनप्रकरणी नोटीस

देशातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आता हळू हळू चांगलाच तापत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रातील सर्वच सत्ताधारी आणि विरोधी राजकिय पक्षांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या स्टार प्रचारकांची एक यादी जाहिर केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने जाहिर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवर हरकत घेत तशी तक्रार राज्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली. त्यावर निवडणूक आयोगाने यासंदर्भात शिंदे गटाच्या शिवसेनेला पत्र पाठवित यावर खुलासा मागितला. पण अखेर खुलासा न आल्याने शिवसेना शिंदे गटाने प्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांची एक यादी जाहिर केली. देशाच्या लोकप्रतिनिधी कायद्यान्वये स्टार प्रचारकांची यादीत फक्त त्याच पक्षाच्या सदस्यांचे नाव असलेल्या व्यक्तीची निवड करता येते. परंतु शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाकडून जी यादी जाहिर करण्यात आली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर घटनात्मक पदावर असलेल्या भाजपाच्या व्यक्तीची नावे स्टार प्रचारकाच्या यादीत जाहिर केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आणि भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतील प्रचारक भाजपा आणि शिवसेना शिंदे पक्षाचे सदस्य आहेत का असा सवाल करत स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार आणि भाजपाच्या बड्या नेत्यांचे नाव कसे आणि सरकारच्या इतर घटनात्मक पदावरील व्यक्ती हे शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत का असा सवाल करत यासंदर्भातील तक्रार मुख्याधिकारी निवडणूक आयोगाकडे दाखल केली.

त्यावर मुख्याधिकारी निवडणूक आयोगाने यासंदर्भातील खुलासा करण्याचे पत्र शिवसेना शिंदे गटाच्या सरचिटणीसांना पाठविले. त्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेने स्टार प्रचारक हे पक्षाचे प्राथमिक सदस्य असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाला पाठविले. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादरच केली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी राज्याबरोबर राज्यातील इतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली नसल्याचा खुलासा मुख्याधिकारी निवडणूक आयोगाने अॅड प्रांजल अगरवाल यांना दिले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *