शरद पवार यांनी भूमिका केली स्पष्ट, होय मी अजित पवारला भेटलो पण…. उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या बंगल्यावर अजित पवार यांची भेट झाली

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसंदीवरून अखेर अजित पवार यांनी राज्यातील भाजपाबरोबर जात राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्यात अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला गैरहजर रहात उद्योगपती अतुल चोरडीया यांच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी गु्प्त बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीनंतर अजित पवार यांनी तोंड लपवित आणि गाडीत झोपून चोरडिया यांच्या बंगल्यातून बाहेर पडले. त्यामुळे या बैठकीबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली. त्यातच जयंत पाटलांसह आणखी एक गट सत्तेत सामील होणार असल्याचं बोललं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांच्या भेटीबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या आहे. सध्या पवार कुटुंबामध्ये सर्वात वडिलधारी व्यक्ती मीच आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी अजित पवारांना भेटलो. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही.

भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार पुढे म्हणाले, भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *