मैदानाची परवानगी बच्चू कडू यांच्याकडे मात्र अमित शाह यांची सभा नवनीत राणांसाठी

सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. या त्यातच अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार पक्षाचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच सामना रंगल्याचे दिसून येत आहे. त्यातच उद्या २३ एप्रिल रोजी बच्चू कडू यांच्या पक्षाची नियोजित सभा येथील मैदानावर होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून रितसर परवानगीही घेतली. त्यातच आता मैदानावरील तयारीच्या पाहणीसाठी बच्चू कडू हे जाण्यास निघाले असता पोलिसांनी मैदानाच्या प्रवेशद्वारावरच रोखले, आणि गृहमंत्री अमित शाह यांची निवडणूक प्रचारसभा असल्याचे सांगत मैदानावर जाण्यास मज्जाव केला. यावरून स्थानिक पोलिस अधिकारी आणि बच्चू कडू यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाल्याचे पाह्यला मिळाले.

यावेळी बच्चू कडू यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आपल्याकडे जाहिर सभेसाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी परवानगी दिल्याचे पत्र दाखवित आमच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आहे. त्यामुळे तेथील मैदानावरील तयारी करण्यासाठी आम्हाला मैदानावर जाण्याची विनंती पोलिसांना केली. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, या मैदानावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भाजपा उमेदवारी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. त्यामुळे या मैदानावर आता जाता येणार नसल्याचे सांगत मैदानाच्या प्रवेशद्वारावरच रोखले.

यावेळी बच्चू कडू यांनी पोलिस आणि निवडणूक आयोगाकडून प्रचारसभेसाठी घेतलेले परवानगीचे पत्र दाखवित पोलिसांना सवाल केला की, आम्ही या मैदानासाठी रितसर परवानगी घेतली आहे. तुम्ही ज्यांची सभा आहे म्हणून सांगता त्यांच्या सभेला परवानगी दिल्याचे पत्र दाखवा असा सवाल करत पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच आमच्या सभेच्या आयोजनाला तुम्ही परवानगी नाकारली असल्याचे आणि राणा यांनी याच मैदानाची मागणी केल्याचे आणि त्यास परवानगी दिल्याचे पत्र असेल तर दाखवा असे आव्हानही पोलिसांना यावेळी दिले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून पोलिसही आता भाजपाच्या कार्यकर्त्यांसारखे वागू लागले काय असा जाब विचारत त्यापेक्षा सरळ भाजपाचे शेले अंगावर घालून फिरा असा खोचक सल्लाही यावेळी संबधित पोलिस अधिकाऱ्याला दिला.

यावरून पोलिस अधिकारी आणि बच्चू कडू यांच्यात बराचवेळा शाब्दीक चकमक उडत राहिली. परंतु पोलिसांनी बच्चू कडू यांना सभेच्या मैदानावर जाण्यापासून रोखून धरले. त्यावर बच्चू कडू यांनी आम्हाला परवानगी नाकारत अमित शाह यांच्या प्रचार सभेला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ मैदानासमोरच आंदोलन करणार असल्याचा इशारा पोलिसांना दिला.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *