देशमुखांनी शिवबंधन हाती बांधताच उध्दव ठाकरे म्हणाले, तारीख ठरवा मी येतो पक्ष विस्ताराच्या दृष्टीकोनातून उध्दव ठाकरे यांची मोठी घोषणा

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आता पक्षविस्तार करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला असून आज संजय राठोड यांचे कट्टर विरोधक संजय देशमुख यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, मी पोहरा देवीच्या दर्शन घेण्यासाठी येणार आहे. मात्र तुम्ही मेळाव्याची तारीख ठरवा मी आलोच असे सांगत राज्यभरात आता फिरणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.

यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ दिले जात आहे. दरम्यान, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झालं ते पटलेलं नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही, तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक सोबत येत आहेत. तुम्ही फक्त लढा. जे होत आहे ते आम्हाला पसंद नाही, असे मला लोक म्हणत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे असेही स्पष्ट केले.

माझे काय होणार, शिवसेनेचे काय होणार? हे ठरवणारे तुम्ही आहात. मला त्याची चिंता नाही. मात्र देशाचे काय होणार? देशात लोकशाही राहणार आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे, असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत मी पोहरा देवीच्या दर्शनाला येणारच आहे. कधी मेळावा घ्यायचा, कुठे घ्यायचा हे ठरवा. मी येणार आहे, असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, स्मार्ट प्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’बाबत तातडीने कार्यवाही करा आढावा बैठकीत दिले निर्देश

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *