जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचः एनसी+काँग्रेस आघाडीवर, पीडीपी ३ जागांवर भाजपाने जम्मूत खाते उघडले

नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने मिळविलेली आघाडी दुपारपर्यंत कायम राखली. जम्मू आणि काश्मीरमधील एकूण ९० जागांपैकी ५२ जागांवर नॅनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने जवळपास ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स ४३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपाला एक जागा जम्मू मध्ये जिंकली असून या निमित्ताने भाजपाने जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूकीत खाते यश मिळाले आहे. तर इतर जागांवर ८ उमेदवार पुढे ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ३ जागांवर पीडीपी आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला लोकसभा निवडणकीत पराभूत झाले होते. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या परांपरागत विधानसभा मतदारसंघातून अन्य एका ठिकाणी असे मिळून दोन ठिकाणी ओमर अब्दुला यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही ठिकाणी ओमर अब्दुला हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या निव़डणूकीच्या निमित्ताने नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू आणि काश्मीर मधील अस्तित्व आणि पकड कायम राखली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर मधील निवडणूकांसंदर्भात इंडिया आघाडीला सत्ता मिळणार असल्याचे निकाल एक्झिट पोलने सांगितले होते. त्यानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी मारली आहे.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे बुधगाव मतदारसंघात १६ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीपीचे उमेदवार आगा सय्यद मुंतजीर मेहंदी आहेत. तर गंदरबल मतदारसंघातही ओमर अब्दुला यांना ५ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. या दोन्ही मतदारसंघात ओमर अब्दुला हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सविस्तर निकालासाठी या लिंकवर क्लिक कराः-

https://results.eci.gov.in/AcResultGenOct2024/partywiseresult-U08.htm

About Editor

Check Also

पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *