जयंत पाटील यांचा आरोप, ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून बाद राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे, शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती

राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनातून बाद करणे राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

याबाबत जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे अशी टीका केली.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही. शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची मागणी, अल्पसंख्याक विभागातील ४०६ रिक्त पदे भरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी, बोलावली मुस्लीम आमदारांची बैठक, मुस्लीम समाजाशी संबधित १२ मागण्या केल्या सादर

राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *