“सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सुनावले

अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज #गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यावरून “सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजपा आमदार चित्रा वाघ यांना त्यांचे नाव न घेता सुनावले आहे. तसेच जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा ! असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना २५ दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले होते. त्यावरून रोहिणी खडसे यांनी ही टीका केली आहे.

About Editor

Check Also

उद्धव ठाकरे यांची टीका, निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी आज शिक्कामोर्तब झाली ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याची केली मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील  जवळपास २१ हून अधिक राज्यात एसआयआर अभियान राबविले. मात्र या अभियाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *