मुंबई: प्रतिनिधी प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नार्थक आव्हानाला उत्तर दिले. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला …
Read More »पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या सूचना मात्र लागू करणार नाही मुख्यमंत्र्यांची राज्यातील जनतेला ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी सर्व सणवार निर्विघ्न पार पडलेले आहेत. मात्र आता नव वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येकाकडून करण्यात येत आहे. नव वर्षासाठी तुम्हाला आतापासूनच शुभेच्छा पण या काळात गर्दी होवून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी युरोपमध्ये जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला तसा आपल्याकडे लागू करावा यासाठी अनेक सूचना आल्या …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, होय मी विकासासाठी अहंकारी, पण कद्रुपणा करण्यापेक्षा चर्चेला या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फरावे मारणे म्हणजे लोकशाही नसल्याचा विरोधकांना टोला
मुंबई : विशेष प्रतिनिधी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या अंहकारी या शब्दाचा धागा पकडत होय मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात अंहकारी असून जे जनतेच्या भल्यासाठी असेल तेच करणार आहे. त्यामुळे विकासकामात आडवाआडवीपणा करण्याचा कद्रुपणा दाखविण्यापेक्षा थेट चर्चेला या बसा असे विरोधकांना आव्हान देत केंद्राच्या बुलेट प्रकल्पालाही विरोध होत असल्याचा …
Read More »या कारणासाठी भेटल्या यशोमती ठाकूर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींना केंद्राने पूरक पोषणसाठी या सुधारित आराखड्यानुसार निधी द्यावा
नवी दिल्ली : प्रतिनिधी केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी २ हजार ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना भेटून केली. कोरोना परिस्थितीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुधारित आराखडा करणे …
Read More »शासकीय भरतीसाठी आदिवासीबहुल ८ जिल्ह्यांतील OBC लोकसंख्या अभ्यासाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर उपसमितीचे प्रमुख छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्रवर्गाची प्रचलित शासकीय पदभरतीमधील आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन या संदर्भात राज्य सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात …
Read More »सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द नव्याने होणार आरक्षण सोडती -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणुक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे जाहीर केले. ११ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात …
Read More »…आणि मंत्रालयात बालनाट्य सुरु भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी बाल रंगभूमीवर बालनाट्य बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात “होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!” नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत, अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर मेट्रो कारशेडच्या विषयावरून टीका केली. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लावली आहे …
Read More »अंहकार सोडून आरेमध्ये मेट्रो कारशेडचे काम सुरु करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला
मुंबईः प्रतिनिधी सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ सरकारच्या अहंकारासाठी हा निर्णय बदलण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आरेची जागा दिली आहे. …
Read More »पाकिस्तानी म्हणणे, ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण; हे चालू देणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विरोधकांना धोबी पछाड
मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी माओवादी म्हणणं, आणि केवळ हक्कभंग आणला म्हणून ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण असून अशा पध्दतीचे राजकारण महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत तसेच कोणीही उठावं आम्हाला टपली मारून जावे या गोष्टीही …
Read More »मुनगंटीवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचे हे सूचक वक्तव्य मराठवाडा- विदर्भ वैधानिक महामंडळ करू मात्र वरिष्ठांची जबाबदारी घ्या
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे महत्वाचे वैधानिक विकास महामंडळ असलेल्या मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपलेली असून ते महामंडळ पुन्हा कधी तयार करणार अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करत कोण आहे तो झारीतील शुक्राचार्य जो प्रस्ताव रोखत असल्याचा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपप्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आम्ही महामंडळ …
Read More »
Marathi e-Batmya