मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते फडणवीसांचे प्रतित्तुर कांजूर मार्ग कारशेडवरून पुन्हा विकास विरूध्द राजकारण

मुंबई: प्रतिनिधी

प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नार्थक आव्हानाला उत्तर दिले.

भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला ? ३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

या समितीनेच सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा ? कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता ? असा आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा आरोप, एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला ! मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी

मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *