राजकारण

पहिल्यांदाच राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी मागच्यावेळी शिवसेना- भाजपा ४२ जागा जिंकली होती. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २२ जागांच्यावर विजय मिळवेलच पण पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सध्या येणारे एक्झिट पोल ठिक आहेत. ते आपापल्या परीने …

Read More »

एक्झीट पोल काहीही म्हणोत आम्हीच सर्व जागा जिंकणार अँड.प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास

अकोलाः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला उद्या मतमोजणी होत असून तत्पूर्वी जाहीर झालेले एक्झीट पोल काहीही म्हणोत वंचित आघाडी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणं टाळलं. ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा तीन दिवस काम बंद आंदोलन वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रूग्णालयातील चतुर्थश्रेणी सेवांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात या वर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी चतुर्त श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारला नुकताच दिला. यासंदर्भात संघटनेने जाहीर प्रसिध्दीपत्रकही काढले आहे. ११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम …

Read More »

पालघर आणि भिवंडीमध्ये होणार निकालाच्या सर्वाधिक ३५ फेऱ्या लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल येणार आहेत. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३५ निवडणूक मतमोजणी निकाल फेऱ्या होतील. पालघर आणि भिवंडी – गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण ३३ निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण ३२ निवडणूक निकाल फेऱ्या …

Read More »

एक्झीट पोलमधील भाजपोत्सवाने नेत्यांमधला उत्साह वाढीला पण २३ मे च्या शिक्कामोर्तबाची वाट

मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झीट आणि ओपिनियन पोलमध्ये भाजप पुरस्कृत रालोआला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या राज्य आणि केंद्रामधील भाजप नेत्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असले तरी २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाच्या दिवसापर्यत पक्षाच्या संकल्प विजयावर शिक्कामोर्तब होण्याची वाट पहावी अशी …

Read More »

वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणासाठी सरकारचा अध्यादेश राज्य सरकारचा निर्णय महसूल मंत्री पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या अद्यादेशामुळे रद्द झालेले विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य …

Read More »

पवार लागले कामाला २१ मे ला भाजप आघाडीतेर पक्षांची दिल्लीत बैठक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …

Read More »

मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता शिथिल करा निवडणूक आयोगाला पत्रः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पदवुत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आऱक्षण होण्याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालने दिलेल्या निकालावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आचारसंहितेमुळे याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आचारसंहितेत सूट मिळावी अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

राज्यातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करायचीय, मुख्यमंत्री महोदय वेळ द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे असे सांगत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका …

Read More »

राफेलमधील चाेरीच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयाकडून चौकशी माहिती अधिकारात मंत्रालयाची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल खरेदी कराराच्या कागदपत्रांवरून मोदी सरकारकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. तसेच याप्रकरणातील कागदपत्रे चोरीस गेल्याचा दावा केला करण्यात आला होता. या चोरीस गेलेल्या कागदपत्र प्रकरणाची संरक्षण मंत्रालयाकडून अंतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती अधिकार कायद्यांतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली. माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर …

Read More »