सरकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा तीन दिवस काम बंद आंदोलन वैद्यकीय सेवांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीतील रूग्णालयातील चतुर्थश्रेणी सेवांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात या वर्गातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य सरकारी चतुर्त श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारला नुकताच दिला.
यासंदर्भात संघटनेने जाहीर प्रसिध्दीपत्रकही काढले आहे.
११ ते १३ जून या कालावधीत तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यासह मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकांनाही यासंदर्भात संघटनेने निवेदन दिले आहे.
विभागाच्या अखत्यारीतील चतुर्थश्रेणी प्रवर्गातील पदे ही खाजगी ठेकेदाराकडून भरण्याची जाहीरात सरकारकडून नुकतीच प्रसिध्द करण्यात आली. तसेचद्वारे निविदाही मागविण्यात आली. त्यामुळे सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर जे अनुकंपाखालील नियुक्तीसाठी वाट पहात आहेत, त्यांचेही काम नसल्याने त्यांना बेकारीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार असल्याचा इशाराही संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एसआयआर (SIR) रद्द करा, निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास नवयुवकांचा नाव नोंदणीस थंड प्रतिसाद, असंतोष पाहता पुन्हा नव्याने अर्ज- ६ भरण्याची मुभा देण्यात आली

निवडणूक आयोगाने सुरु केलेली एसआयआर मोहिम सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची व वेळकाढूपणाची ठरली आहे. आयोगाच्या कामाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *