मुंबई : प्रतिनिधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील भाजप शासित राज्यातील सत्ता मतदारांनी उलथवून टाकली. त्यामुळे भाजप आता नको अशी भावना स्थानिकांमध्ये झाल्यानेच जे नको ते नाकारणाऱ्या मतदारांचे जाहीर आभार मानत असल्याची उपरोधिक टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. निवडणुकीत हार-जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. …
Read More »बेरोजगार अंशकालीन पदवीधरांच्या नशीबी अखेर कंत्राटी नोकरीच राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याची कामगार मंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरूणांना नोकरी शोधण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन मिळावे यासाठी अंशकालीन पदवीधरांना तात्पुरत्या स्वरूपात नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु राज्य सरकारकडून कधी तरी केल्याच्या कामाची पावती म्हणून पदवीधरांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येईल अशी वेडी आशा लागून राहीली होती. मात्र या पदवीधरांना पुन्हा शासकिय संस्थांमध्ये …
Read More »सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच छिंदमचा विजय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांचा घोर अवमान करणारा श्रीपाद छिंदम सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच निवडणूक जिंकला असून त्याचा विजय शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा आहे. अशी कठोर प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले …
Read More »धुळे महापालिकेत सत्ता भाजपकडे तर अ.नगरमध्ये युतीकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक जागा भाजपला तर सर्वाधिक कमी काँग्रेसला जागा मिळाल्या
मुंबई : प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेच्या निवडणूकीत डावलले जात असल्याच्या कारणाने भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता येण्यास अडचण होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेत तब्बल ५० जागा जिंकत …
Read More »छत्रपतींविषयी अनुद्गार काढणारा छिंदम निवडणूकीत विजयी अहमदनगर महापालिका निवडणूकीत दोन हजार मतांची आघाडी
अहमदनगर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने राज्यातील जनतेचा रोष ओढावलेल्या आणि तडीपारीची शिक्षा भोगत असलेला श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणूकीत दोन हजार मतांनी विजयी झाला. शिवरायांबद्दल अनुद्गार काढल्यानंतरही अहमदनगर शहरवासियांनी त्याला स्विकारले हे विशेष आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून येवून शहराच्या उपमहापौर पदी विराजमान झालेल्या श्रीपाद छिंदम यांने …
Read More »शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करू नका कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस …
Read More »चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप
दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर सरकार दिशाभूल करत असल्याचा प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल …
Read More »भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन
अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …
Read More »मानव-वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवे धोरण धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य वन्यजीव मंडळाची १४ वी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार प्रभूदास …
Read More »
Marathi e-Batmya