राजकारण

टँकर देण्यासाठी २०१८ च्या लोकसंख्येचा आधार घ्या मराठवाड्यातील ३ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

दुर्बल व वंचित घटकांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करा! काँग्रेसची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी शालेय प्रवेशात राखीव असणाऱ्या २५  % जागांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या बंद आहे, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करून त्याची मुदत शाळा सुरू झाल्यानंतर ३ महिने सुरू ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे …

Read More »

काळीजादू करणाऱ्यांशी भाजपचा संबंध काय? चौकशी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून सर्व हातखंडे वापरले जात आहेत. भिवंडीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर होमहवन, जादूटोणा करण्याचा प्रकार हा त्यातलचा एक आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून जादूटोणा करणात आला? असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते …

Read More »

निवडणूक आयोग मोदींच्या दावणीला बांधलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकशाहीवरचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची …

Read More »

व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा आ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

ठाणे : प्रतिनिधी व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे २१ राजकिय पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी …

Read More »

पराभवाच्या नैराश्याने ग्रासल्यामुळे भाजपकडून बेछूट विधाने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह विधानाचा प्रदेश काँग्रेसकडून निषेध

मुंबई : प्रतिनिधी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान आक्षेपार्ह व निंदनीय आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव स्पष्टपणे दिसू लागल्याने भाजपला नैराश्याने ग्रासले असून, त्यामुळे त्यांची प्रचाराची पातळी खालावून बेछूट, बेताल विधाने केली जात असल्याचे टीकास्त्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी …

Read More »

स्ट्रॉंगरुममध्ये जँमर बसवा आणि उमेदवारांना प्रवेश देवू नका काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आयोगाकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंगरुममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये अशी मागणी करत स्ट्रॉंग रूममध्ये जाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे आक्षेप घेतला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्ट्राँग रूममध्ये जँमर बसविण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यामध्ये यशस्वी …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आय़ोगाने घेतला. आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून आयोगाकडे मागणी केली होती. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध …

Read More »

दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडची वसूली थांबवा आणि नव्याने कर्ज द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी पुर्वीचे सरकार चारा छावण्यात शेतकर्‍यांची सरसकट जनावरे घ्यायचे. मात्र आज शेतकर्‍यांचे फक्त पाच जनावरे घेण्याचे बंधन आहे. तसेच प्रत्येक जनावरामागे फक्त ९० रुपये खर्च केले जातात. सध्या राज्यातील चारा छावण्यात अपुरा कडबा दिला जातोय. त्यासोबत ऊसाचे वाढे खायला दिल्याने जनावरांची जीभ कापली जाते. यासोबतच सरकारने सर्व प्रकारच्या वसुली तात्काळ …

Read More »

दानवेंच्या जावयासाठी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे प्रयत्न भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी …

Read More »