शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अभियानाची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अभियानात …
Read More »आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची माहिती
आदिवासी विकास विभागातील गट – क संवर्गातील विविध रिक्त पदांकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एसईबीसी संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती. आता विभागातील बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार …
Read More »महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये १९ टक्के वाढ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ऊर्जासंबंधी कार्यरत या तीनही कंपन्यांमध्ये काम …
Read More »नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य तातडीने पाऊले उचलण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
नागपूर येथील महत्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावित, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नागपूर येथील मिहान प्रकल्पाबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मृद व जलसंधारण …
Read More »महायुतीत अजित पवारांना ४० जागा, शिंदे गटाला ७० तर भाजपा१५० +, मेतकुट जमेना महायुतीच्या बैठकीत अमित शाह यांच्या उपस्थित झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेवर एकमत
राज्यातील विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास आता एक महिन्याचा अवधी लागला असून स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेला काल अमित शाह यांच्या उपस्थित सुरुवात झाली. या बैठकीत भाजपाने १५० + जागा लढविण्याबाबत जवळपास एकमत झाले असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …
Read More »छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य, मी बोलण्यापेक्षा माझं काम अधिक बोलतं… मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
येवला विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहे. ही विकासकामे करतांना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाही. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझी कामे अधिक बोलतात असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची घोषणा,… सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवणार वंचित बहुजन आघाडीने बांधली सर्व आदिवासी पक्ष संघटनाची मोट!
आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस आम्ही केला आहे. काही सर्वसाधारण जागेवर आदिवासी निवडणूक लढवतील, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. राज्यातील सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन निवडणूक लढणार …
Read More »प्रविण दरेकर यांचा इशारा,… अहंकारच तुमचा वैचारिक ऱ्हास करेल मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर
मराठा समाजाने पाठबळ देऊन तुमच्यातील अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्यात एवढा अहंकार आलाय कि तोच तुमचा वैचारिक ऱ्हास केल्याशिवाय राहणार नाही, असे सणसणीत उपरोधिक टोला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, मी भंगार आहे कि अंगार आहे हे …
Read More »भाजपाचा बृजभूषणला सल्ला विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या विरोधात टीका नको हरयाणा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर दिला सल्ला
भाजपाने पक्षाचे माजी खासदार बृजभूषण सरण सिंह यांना ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हरयाणात सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टीका करण्याचे टाळावे असा सल्लाही भाजपाच्या श्रेष्ठींनी दिली असल्याची माहिती पुढे आली. ऑलिंम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि …
Read More »
Marathi e-Batmya