काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांची हॉस्पीटलमध्ये तपासणी नंतर वर्षावर पोहोचले पांढऱ्या पेशी कमी- जास्त होत असल्याचे आणि लो बीपी, ताप आदींचा त्रास

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपासून प्रकृती अवस्थामुळे घरी आराम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना सातत्याने ताप येणे, त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होणे, कमी रक्तदाबाचा त्रास आदी तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रस्त असल्याची माहिती पुढे येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये पुन्हा एकदा तपासणी केल्यानंतर वर्षा या शासकिय बंगल्याववर पोहोचत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी उपस्थित राहिले.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळपास ७ ते ८ महिन्यापूर्वी त्यांच्या घशातील इन्फेक्शन आणि फुफुस्साच्या त्रासावर राज्य सरकारी सेवेतील एका डॉक्टरांने उपचार करण्याचा सल्ला दिला होता. तसेच काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु हा आजार एकनाथ शिंदे यांनी अंगावर काढला. मात्र गेल्या काही दिवसात हा आजार बळावला. त्यातच त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशीचे प्रमाण कधी जास्त तर कधी वाढत आहेत. तसेच अंगात सातत्याने तापही कमी जास्त होत असल्यानेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी आरामासाठी गेले होते. मात्र त्यांच्या तब्येत फारसा फरक पडला नाही. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील डॉक्टरांकडून यासंदर्भात उपचारास सुरुवात करण्यात आली. तरीही एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. परंतु आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिना निमित्त राज्य सरकारकडून आयोजित बैठकीसाठी खास मुख्यमंत्री हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

तत्पूर्वी एकनाथ शिंदे हे आज सकाळी त्यांच्या घराजवळील ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये प्रकृतीची तपासणी आणि टेस्ट करण्यात आली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा या शासकिय निवासस्थानी बैठकीसाठी हजर राहिल्याची माहिती शिंदे यांच्या गोटातील एका अधिकाऱ्याने दिली.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *