मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर आणि स्थानिक भाजपा आमदार खासदारांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्या. या घटनेमुळे महायुती सरकार धास्तावले असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी शिवरायांच्या समाधीवरुन केलेल्या विधानामुळे आता पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची स्थिती …
Read More »विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी उच्चधिकार समिती राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्ती
विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक न्याय व …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारचा भूखंडावर ताव, लाडक्या मंत्र्यांसाठी योजना बिल्डरमंत्री संजय राठोड लाभार्थी
महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल …
Read More »पवन खेरा यांचा सेबी प्रमुखावर आरोप आणि महिंद्राची स्पष्टोक्ती माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीतून उत्पन्न मिळविल्याचा आरोप
काँग्रेसने मंगळवारी सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हितसंबंधांचे नवीन आरोप केले आणि दावा केला की त्यांचे पती धवल बुच यांना २०१९-२०२१ दरम्यान महिंद्रा आणि महिंद्रा समूहाकडून “वैयक्तिक क्षमतेने उत्पन्न” म्हणून ४.७८ कोटी रुपये मिळाले. महिंद्रा समूहाने हा आरोप खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना …
Read More »कॉम्रेड सीताराम येचुरी रूग्णालयात, प्रकृती चिंताजनक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती
देशातील काँग्रेसच्या नेकृत्वाखालील युपीए १ आणि २ च्या काळात कॉम्रेड सीताराम येचुरी यांची भूमिका प्रामुख्याने महत्वाची ठरली होती. मात्र कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाच्या आजारामुळे दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येचुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाच्यावतीने देण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये सांगण्यात …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, ‘हिट अँड रन’ प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही? पोलिसांवर दबाव कोणाचा ? कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी भाजपाच्या दावणीला
भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत अनेक गाड्यांना ठोकरले. पण बावनकुळेंच्या मुलावर अद्याप कारवाई केली नाही. पोलिसांवर कोणाचा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, भाजपा – काँग्रेसच्या तालावर आदिवासी नाचणार नाही दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची युती परिवर्तन घडवेल
आदिवासी भाजपा आणि काँग्रेसच्या तालावर नाचणार नाहीत. आदिवासींना समान हक्क आणि सामाजिक न्याय नाकारला गेला आहे आणि त्यांचे जल, जंगल, जमिन भाजपा आणि काँग्रेसच्या एकापाठोपाठ आलेल्या सरकारांनी लुटले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आदिवासींच्या वनजमिनी बाहेरच्या …
Read More »एनआयआरएफ च्या रॅकींगमध्ये दक्षिण भारतातील २५ पैकी १० महाविद्यालये आयआयटी शिक्षण संस्थांचाही समावेश
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंगच्या टॉप २५ यादीत दक्षिण भारतातील शैक्षणिक संस्थांचा वाटा गेल्या पाच वर्षांत सातत्याने उच्च आहे. गेल्या पाच वर्षांच्या एनआयआरएफ NIRF रँकिंगचे विश्लेषण केले आणि असे आढळले की टॉप २५ संस्थांपैकी किमान ४० टक्के (एकूण श्रेणी) दक्षिण भारतातील – केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा – …
Read More »नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची माहिती
आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, …
Read More »
Marathi e-Batmya