राजकारण

मोदींच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, जेवढा कर जातो त्या तुलनेत…. पण सर्वात आधी केंद्राचा कर नंतर राज्यांचा कर

पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात असलेल्या व्हॅट टॅक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर आरोप करत राज्यातील महागाई वाढीस महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. त्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर देत थकीत जीएसटीच्या रकमेवरून निशाणा साधला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी …

Read More »

महाराष्ट्रात “सत्तेचे भोगी” म्हणत राज ठाकरेंनी केले “योगी आदित्यनाथां”चे अभिनंदन भोंगे उतरविल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

जवळपास २० दिवसांहून अधिक काळ मनसेने राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक पवित्रा घेत भोंगे उतरवा नाही तर मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. मात्र त्यानंतर टीका-टीपण्णीला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळावरील भोंगे उतरविल्याबद्दल राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील यांची घोषणा, लकडावालाकडून घेतलेल्या कर्जाची चौकशी ईओडब्लू कडून चौकशी होणार

हनुमान चालिसावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेनेसह थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे त्यांना दोन गटात तणाव निर्माण केल्याप्रकरणी आणि शासकिय यंत्रणांना आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवित त्यांना तुंरुगात रवानगी केली. त्यानंतरही नवनीत राणा यांनी थेट लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवित …

Read More »

फडणवीसांचा मुख्यमंत्र्याना टोला, यापेक्षा दुसरे काही करणार आहात का? मोदींना प्रत्युत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाणा

बिगर भाजपाशासित राज्यातील राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केली नसल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यातील नागरीकांना भेडसावत असलेल्या महागाईस तेथील राज्य सरकारेच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वाधिक महसूल मुंबईसह महाराष्ट्रातून केंद्राच्या तिजोरीतून जातो. मात्र महाराष्ट्राला केंद्राकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा …

Read More »

भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की नाही हे सांगा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा आघाडी सरकारला सवाल

प्रार्थनास्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणार की नाही, याचे उत्तर आघाडी सरकारने द्यावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, राज पुरोहित, मुंबई सरचिटणीस संजय …

Read More »

सोमय्यांनी गंभीर दुखापतीचा अहवाल राज्यपालांना सादर करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

सर्वप्रथम सोमय्या यांनी राज्यपालांना आपल्याला झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल सादर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. आज भाजपा नेते किरीट सोमय्या राज्यपाल भेटीसाठी राजभवनात गेले होते त्यावर महेश तपासे यांनी ही मागणी केली. किरीट सोमय्या यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, असा साधारण अहवाल …

Read More »

भुजबळ म्हणाले, राणाने लकडावालाकडून ८० लाख घेतल्याचा तपास पोलिसांबरोबर ईडीनेही करावा संजय राऊत यांच्या मागणीला दिला दुजोरा

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या …

Read More »

पेट्रोल-डिझेलवरील पंतप्रधान मोदींच्या आरोपाला मुख्यमंत्री ठाकरेंचे प्रत्युत्तर पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशातील काही राज्यांमध्ये कोविडच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. मात्र या या बैठकीत कोविडबरोबरच बिगर भाजपाशासित राज्यांमध्ये असलेल्या पेट्रोल-डिझेलवरील कराच्या अनुषंगाने आणि वाढीव किंमतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना जबाबदार धरत या महाराष्ट्रातील …

Read More »

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासह या राज्यांना केली पेट्रोल-डिझेलवरून विनंती करात कपात करण्याची केली सूचना

मागील काही महिन्यापासून संपूर्ण देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या जाचक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडूसह सात राज्यांना वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करावी अशी विनंती केली. तसेच कर कपातीवरून मी कोणावर टीका करत नाही तर विनंती करत असल्याचेही …

Read More »

चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर माजी मंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट ?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशी कऱण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर राज्य सरकारने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती चांदिवाल …

Read More »