प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका, डोनाल्ड ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत परखड शब्दांत निशाणा साधत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोदी सरकारने देशाच्या सार्थक धोरणाचे समर्पण केल्याचा गंभीर आरोप केला.

सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “थूकून चाटणे म्हणजे काय, हे मोदींच्या भूमिकेत दिसले; डोनाल्ड ट्रम्प यांनी थुंकले आणि मोदींनी चाटले,” अशा तीव्र शब्दांत टीका करत कथित राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची थूक चाटायची आणि देशात राष्ट्रवादाच्या गप्पा मारायच्या, हा कसला राष्ट्रवाद?” असा सवालही यावेळी उपस्थित केला.

या ट्विटमध्ये त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत, त्या विधानामुळे मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे भारताची अर्थपूर्ण आणि स्वायत्त धोरणे समर्पित केल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे अत्यंत गंभीर आरोप करत पंतप्रधान मोदी यांना अमेरिका वैयक्तिक पातळीवर ब्लॅकमेल करत असल्यामुळेच हा तडजोडीचा मार्ग स्वीकारला गेला, असा आरोप केला. “मोदी कॉम्प्रोमाइज्ड आहेत,” असे म्हणत त्यांनी या परिस्थितीला राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी धोकादायक ठरवले.

पुढे त्यांनी इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशा प्रकारे तडजोडीच्या भूमिकेत असलेले पंतप्रधान देशाला पुन्हा गुलाम बनवू शकतात, अशी मोठी भीतीही यावेळी व्यक्त केली.

या ट्विटमधून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर, राष्ट्रवादाच्या दाव्यांवर आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर एकाचवेळी बहुआयामी आणि आक्रमक टीका केली असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *