राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदीः उपाध्यक्ष पद मविआकडे? अध्यक्षपदासाठी एकट्या नार्वेकरांचा अर्ज

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर रितसर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे-अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. या शपथविधीनंतर आयोजित विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. निवडणूकीत महायुतीला २३१ जागा मिळाल्याने निर्विवाद बहुमत महायुतीच्या बाजून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपदीही भाजपाकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष पदासाठीचा अर्ज आज विधिमंडळाचे (पदभार १) चे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे सादर केला.

वास्तविक पाहता मागील अडीच-तीन वर्षे विधानसभेच्या अध्यक्ष पदावर काढलेल्या राहुल नार्वेकर यांना यावेळी राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करायचे होते. तशी इच्छाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांकडे बोलून दाखविली होती. मात्र गतवेळी भाजपा निष्ठ म्हणून केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदाची संधी देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यानुसार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला.

महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने मंत्री पदाच्या वाटपाच्या चर्चे दरम्यान गृहमंत्री पद, विधानसभा अध्यक्ष पद आणि महसूल खात्याची मागणी भाजपाचे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरील चर्चेत केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या दोन पदावरून एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरु केले होते. तसेच शपथविधी सोहळ्यातही सहभागी न होण्याचे संकेत दिले. परंतु शिंदे यांच्या नाराजीला नाराजीला भाजपाकडून फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ऐनवेळी शपथविधीच्या दिवशी ऐनवेळी सहभागी होण्याची पाळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर आली.

तसेच विधानसभा अध्यक्ष कमकुवत किंवा विरोधकांच्या दबावाला बळी पडणारा असेल तर सत्ताधाऱ्यांची अवस्था काय होते याची उत्तम उदाहरण म्हणून २०१९ च्या निवडणूकीनंतर झालेल्या परिस्थितीमुळे आणि त्या मागे असलेल्या भाजपाने खबरदारीचा उपाय म्हणून विधानसभेचे अध्यक्ष पद हाती ठेवले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांचा दावा आधीच फेटाळून लावलेला असल्याने त्यांच्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवाराकडून उमेदवारीचा अर्ज येणे शक्य नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदावर राहुल नार्वेकर यांचीच निवड जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याची अधिकृत घोषणा उद्या सोमवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळावे यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, डॉ नितीन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, प्रथेप्रमाणे विधानसभेचे उपाध्यक्ष पद विरोधकांकडे असते. त्यानुसार महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तशी मागणी केली.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, जरी संख्याबळ कमी असले तरी विरोधी पक्षनेते पद आणि संविधानिक पदे महाविकास आघाडीला मिळावीत अशी मागणी केली. विधानसभेत विरोधकांचा संख्या कमी असली तरी आवाज कायम राहणार असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *