राज ठाकरे यांच्याकडून वरळीत संदीप देशपांडे, तर माहिममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहिर

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक गुप्त बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसेकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर सुरुवातीला वरळीतून इच्छुक असलेले अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मनसेकडून जारी करण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज २२ ऑक्टोंबर रोजी निवडणूकीची अधिसूचना जाहिर करण्यात आली. या नोटीफिकेश सोबत राज्यातील २८८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानुसार आज राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ५७ उमेदवारांनी ५८ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात इतर राजकिय पक्षांचे उमेदवारांची यादी जाहिर होऊन उमेदवार अर्ज भरतील.

मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून अनेक ठिकाणी उमेदवारांची यादी जाहिर होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच वरळी मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच वरळी मतदारसंघ हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ म्हणून सध्या ओळखला जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्याऐवजी तेथून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली. तर अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आलेली आहे.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *