राज ठाकरे यांच्या पोस्टवर शरद पवार यांची खोचक टीका, महिना-दोन महिन्यानंतर जागे… आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जातीपातीबाबत केली होती पोस्ट

राज्यातील वारकरी संप्रदायांच्या आषाढी एकादशी निमित्त राज्यातील सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांकडून आषाढी वारीचे निमित्त साधत राज्यातील अनेक प्रश्नी विठ्ठलाला साकडे घातले. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशी निमित्त साधत महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

यापूर्वी अनेकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीपातीचे राजकारण वाढल्याचे आणि शरद पवार यांनी जाती-पातीचे राजकारण केल्याची टीका अनेकदा केली. त्यावरून आज नेमके पुण्यात असलेल्या शरद पवार यांनी त्याच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना टोला लगावला.

काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांनी एक्स या प्रोफाईलवर पोष्टवरून शरद पवार यांना सवाल केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, ते आज पहिल्यांदाच बोलले नाहीत. यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत. ते त्यांच वैशिष्टे आहे. ते ८-१० दिवसांनी किंवा महिना-दोन महिन्याने कधी जागे झाले तर असं बोलतात. साधारणतः ज्याच्या वर टीपण्णी केली की लोक दखल घेतात त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात असे सांगत खोचक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *