मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटः वातावरण दहशतीचे संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पवारांनी घेतली

काल संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मस्साजोग येथे जात हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि एकटे समजू नका असे सांगत धीर दिला.

यावेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील तसे मराठवाड्यातील बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याशी माझे नेहमीच संबध राहिले आहेत. मात्र जी घटना घडली त्या घटनेमुळे बीडमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या जर कोणी स्वतःला एकटं समजतं असेल तर तसे समजू नका असा धीर देत एकटं समजाणाऱ्यांसोबत आम्ही सर्व जण आहोत असे सांगत हत्या करण्यात आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत गावकऱ्यांना धीर दिला.

यावेळी शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घटनेच्या अनुषंगाने माहिती घेतली. त्यावेळी संतोष देशमुख हे त्यांच्या घरातील एकमेव कमावते असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी असल्याचे सांगत बारामतीत असलेल्या शिक्षण संस्थेत मुलींच्या शिक्षणात सोय करण्यात येईल असे सांगत पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर राहिल असेही यावेळी शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शब्द दिला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा विषय संसदेबरोबरच विधानसभेत सातत्याने उचलण्यात आला. तसेच या प्रकरणी राज्याच्या राज्य सरकारला लवकर निर्णय घ्यायला लावू असे सांगत याप्रकरणी राज्याच्या मंत्र्यांना भेटू असेही यावेळी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत झालेल्या घटनेची माहिती घेताना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या हत्येत सहभागी झालेल्यांना लवकरच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संतोष देशमुख यांच्या मुलीने आणि त्यांच्या आईने शरद पवार यांच्यासोबत बोलताना केली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बीड मध्ये जे काही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते दहशतवादी वातावरण संपले पाहिजे. तसेच कोणी स्वतःला एकटं समजत असेल तर तसे समजू नये असेही सांगत यावेळी धीर दिला. तसेच बोलताना शरद पवार म्हणाले की, जे काही झालं ते कोणाला न पटणारं आहे. या प्रकरणी निवडणूक आलेल्या सरपंचाची अशा पद्धतीने प्रकार घडावा हे दुर्दैवी आहे. या प्रकरणातील जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत या प्रकरणी बीड आणि आजूबाजूचे अनेक हितचिंतक आपल्याला मदत करायला तयार आहेत. त्यामुळे सध्या जे काही दहशतवादाचे वातावरण झाले आहे. त्या विरोधात जर सामुहीक निर्णय घेण्यात आला तर त्यास कोणी अडवू शकणार नाही. त्यामुळे हे दहशतवादाचे वातारण संपवून पूर्वीसारखं बीड जिल्ह्यातील वातावरण करू असेही यावेळी सांगितले.

यावेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार निलेश लंके, बीडचे खासदार बजरंग सोनावणे, माजी आमदार राजेश टोपे आदी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे भावविवष झाले होते. तसेच याप्रकरणातील मास्टरमाईंडला अटक झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *