शिवसेना नेते आदीत्य ठाकरेंच्या उपस्थितीने सेना आमदारांमध्ये आले हत्तीचे बळ आमदारांचे कामकाज पाहण्यासाठी ज्यु.ठाकरेंची विधानसभेत उपस्थिती

नागपूरः प्रतिनिधी

विधानसभेचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशनातील शिवसेना आमदारांच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे हे स्वःजातीने उपस्थित राहीले. त्यामुळे सेनेच्या सर्वच आमदारांनी विधानसभेत आवर्जून उपस्थिती दाखवित आपल्या अंगात आलेले हत्तीचे बळही आक्रमक पध्दतीने दाखविला.

सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभागृहाच्या आमदार-खासदारांच्या गँलरीत शिवसेना नेते आदीत्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत इतर काही पदाधिकारी येवून स्थानापन्न झाले. याची माहिती शिवसेनेच्या आमदारांना कळताच सर्व आमदार झाडून सभागृहात हजर झाले. नेमक्या याच कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण सभागृहात मांडण्यात आले होते. त्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी भुजबळ यांच्या संदर्भात झालेल्या प्रकरणी निलंबनाची मागणी केली. त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नागेश पाटील-आष्टेकर आणि राजेश क्षिरसागर या दोन आमदारांना झालेल्या मारहाणीचा मुद्दाही उपस्थित केला.

या दोन्ही प्रकरणात सरकारने तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत याप्रश्नी घोषणाबाजी केली.

दरम्यान, शिवसेना नेते ठाकरे यांनी आमदारांच्या या आक्रमक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे नाणार प्रश्नी, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली. तर कधी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सभागृहात साथ दिली. त्यामुळे भविष्यकाळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

About Rajesh Salgaonkar

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *