शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकातून सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने चांगला आराखडा तयार करून सादर करावा असा आदेश नगरविकास विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी या बैठकीस उपस्थित होते.

राज्य सरकारकडून दादर येथील महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांची माहिती, राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ अंगणवाडीतून बालकांना पोषण, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पोषण

राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३८३२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *