उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, तेव्हा एकनाथ शिंदे डस्ट बिनमध्ये होते हे माहित नव्हते पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोटांगण घातले दाव्याला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर

विधान परिषदेत नागपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तुमच्या पक्षाच्या नेत्याने लोटांगण घातले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोण कोणाकडे जातोय याची सगळी माहिती आपल्याला असल्याचे सांगत मी तिथे युतीचे सरकार स्थापन करू असे सांगितले मात्र इथे आल्यानंतर पुन्हा पलटी मारली असा गंभीर आरोपही केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी खोचक आणि नेमक्या शब्दात प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे हे डस्टबीन मध्ये होते हे माहितच नव्हते असा टोला लगावला.

शिवसेना उबाठा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद आणि नागपूरमध्ये निर्माण झालेली दंगलसदृश स्थिती यावर आपली भूमिका विधान भवनाच्या माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली.

पत्रकारांनी त्यांना ‘तुम्ही दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांच्यापुढे माफी मागितली असा दावा एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केला आहे, त्यात काय तथ्य आहे,’ असा सवाल केला. यावर बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलंच नाही. चला जय हिंद,” असं एका वाक्यात उत्तर दिलं. या उत्तरावर एकच हशा पिकला.

औरंगजेब कबर प्रश्नी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, औरंगजेबाचा जन्म हा गुजरातमध्ये झालेला आहे. तसेच केंद्रात भाजपाच्या नरेंद्र मोदी याचा जन्मही गुजरातमध्ये झालेला आहे. आणि केंद्रात भाजपाचेच यांचे सरकार आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर काढून टाकायची असेल तर काढून टाका. पण त्यासंदर्भात सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जा आणि त्यासंदर्भात विचारा, शेवटी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण केंद्र सरकारकडूनचे देण्यात आले आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या औरंगजेबाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कामाचे ऐतिहासिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न जो काही भाजपाकडून करण्यात येत आहे. ज्या महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात आला. मात्र २७ वर्षे त्याला महाराष्ट्रातच घालवावी लागली आणि या महाराष्ट्राच्या मातीतच मेला. त्यामुळे औरंगजेबाची कबर हि त्या ऐतिहासिक क्षणाची साक्षिदार आहे. त्यामुळे राज्यातल्या भाजपाच्या नेत्यांनी गुजरातमध्ये जन्मलेल्या औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यासाठी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी जावं असो आणि विचाराव असा खोचक टोलाही यावेळी ल़गावला.

तसेच शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, औरंगजेबाची कबर हटविण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करावे आणि त्यास प्रमुख पाहुणे म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना बोलवावे आणि कबर काढून टाकण्याचे काम करावे अशी खोचक मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *