सुषमा अंधारे यांचा सवाल, एकनाथ शिंदेच्या फोनचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का? भोंदू बाबा खरात प्रकऱणावरून सुषमा अंधारे यांचा सवाल

राज्याच्या राजकारणात उच्च पदावर असलेल्या नेत्यांचे भविष्य सांगणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी ज्या नेत्यांचा यामध्ये संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासणी करण्याची मागणी केली ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखाते दाखवेल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

अशोक खरात याच्या अटकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते आणि सेलिब्रेटी यांचे भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळं राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी  संताप व्यक्त केला असून  त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

शिवाय, अशोक खरात प्रकरणात नावे असलेल्या नेत्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली. एकनाथ शिंदे यांचा पूजा करतानाचा फोटो समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्ट पुढे येत आहे. दीपक केसरकर दर महिना-दीड महिन्याला जात होते, असे सांगण्यात येत आहे. अनेक खळबळजनक दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात सामील असलेल्या सगळ्या राजकिय लोकांची तपासणी करण्याची जबाबदारी गृहखात्याची आहे, असं अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे नेहमी जातात, त्या अमित शाह यांच्यासोबत खरातचा फोटो आहे, हे खूप महत्वाचे आहे. जयंत पाटील, नार्वेकरांचीही चौकशी करा. माझ्या पक्षाचा कोणी यात अडकला असेल तर त्याचीसुद्धा यात गय केली जाऊ नये. हा प्रश्न लेकीबाळींच्या इभ्रतीचा आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांची अटक जास्त महत्वाची वाटते, असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, रूपाली चाकणकर या खरातसोबत अघोरी कृत्यात सामील असल्याचे उघड होत आहे. त्यांच्या अनामिकेला त्यावेळी बँडेज होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही केली.

About Editor

Check Also

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *