Tag Archives: home minister

काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार संसदेत उत्तर देणार परंतु विरोधकांनी त्यांच्या उत्तरात अडथळे आणू नये-किरेन रिजिजू

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमित शाह यांनी फायरिंग करण्याचे आदेश दिले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर एनडीए खासदारांनी तीव्र विरोध दर्शवला. पेपर फुटी प्रकरणी विधेयकावरील …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, तर अशा प्रकारच्या गोष्टी दहापट मोठ्या घडू शकतात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला इशारा

राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा विजय असल्याचे म्हटले, परंतु सरकारला इशारा दिला की हे आंदोलन एका मोठ्या संकटाची केवळ सुरुवात आहे. जर सरकारने लोकांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर अशाच प्रकारच्या घडामोडी ‘दहापट मोठ्या’ प्रमाणात घडू शकतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी …

Read More »

राहुल गांधी यांचे भाकित, नरेंद्र मोदी वर्षभरही पंतप्रधान पदावर टीकणार नाहीत मोदी सरकार संस्थात्मक बंडाला सामोरे जाण्याच्या स्थितीत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षभरात पदावर टिकणार नाहीत. मोदी सरकार एका “संस्थात्मक बंडा”चा सामना करत असून, त्याबद्दल राहुल गांधी यांनी व्यवस्थेमधूनच “आतली माहिती” मिळत असल्याचा दावाही केला. बुधवारी (३ जून, २०२६) काँग्रेसच्या राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक संमेलनात, पक्षाच्या एका बंद दाराआडच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी फडणवीसांनी थापा मारण्यापेक्षा कृती करावी, महिला सुरक्षेवर भाजपा सरकार गंभीर नाही, महिला अत्याचार रोखण्यासाठी बनवलेला शक्ती कायदा मोदी सरकारकडे मंजूरीसाठी पडून..

पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …

Read More »

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १२ हजार २५८ ने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) व बारामती (पुणे) येथे अनुक्रमे १८, ३५ व ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित …

Read More »

सुषमा अंधारे यांचा सवाल, एकनाथ शिंदेच्या फोनचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का? भोंदू बाबा खरात प्रकऱणावरून सुषमा अंधारे यांचा सवाल

राज्याच्या राजकारणात उच्च पदावर असलेल्या नेत्यांचे भविष्य सांगणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी ज्या नेत्यांचा यामध्ये संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासणी करण्याची मागणी केली ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखाते दाखवेल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. अशोक खरात …

Read More »

अखेर सोनम वांगचुक यांची केंद्र सरकारने केली मुक्तता १७० दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर केली सुटका

केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) १७० दिवसांची अटक रद्द केल्यानंतर, लडाखी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांची शनिवारी (१४ मार्च २०२६) जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. हवामान कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांची अटक जवळजवळ सहा महिन्यांनंतर रद्द केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप करून या …

Read More »