अजित पवार यांचा सवाल, गुवाहाटीला जाताय, कुणाचा बळी देणार

राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे.

त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिंदे गटाने गुवाहाटीला कामाख्या देवी मंदिरात नवस केला होता. आता तो नवस पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि ५० आमदार जात आहेत. मात्र कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात तशी तिथे  प्रथा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाणार आहेत, असा खोचक सवाल अजित पवार यांनी केला आहे. शिंदे गटाचे मंत्री, त्यांचे समर्थक आमदार आणि  खासदार पुन्हा एकदा गुहाटीला जाणार आहेत अशी माहिती त्यांचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीच दिली होती. तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी देखील आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा नवस कामाख्या देवीला केला होता.असे सांगत आता नवस फेडायला जाणार आहोत असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक ५० आमदार आणि १३ खासदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची राज्यभर सुरू असतानाच त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी करतीना म्हटले आहे की, काही ठिकाणी बोकडांचा बळी दिला जातो, तर काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी देण्याची प्रथा असते मात्र कामाख्या देवीला रेड्यांचा बळी दिला जातो.अशे मला कळाले आहे.तर आता कोणाचा बळी देण्यासाठी ते गुहाहाटीला चालले आहेत, ते आता आपण बघूया, असे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *