भरपावसात उद्धव ठाकरे यांची टीका, वाघाचं कातडं पाघंरणाऱ्या गाढवाची गोष्ट माहित आहे का ? अमित शाहचे जोडे त्यांनाच लखलाभ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपावर टीका

शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. परंतु संध्याकाळपासून अचानकच कधी पाऊस तर कधी ऊन असे निसर्गाचे चित्र पाह्यला मिळत. त्यातच पाऊस सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते मंचावर उपस्थित होते. या भरपावसातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमाम शिवसैनिकांना दसऱ्याच्या सुरुवात केली.

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच उपस्थित शिवसैनिकांना वाघाचं कातजं पाघंरलेल्या गाढवाचं चित्र पाहिलं का असा सवाल करत पण बाळासाहेबांची शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र आज मी पहिल्यांदा पहात असल्याची खोचक टीका एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता करत उद्धव ठाकरे म्हणाले की, जिवाला जीव देणारी हेच खरं आयुष्यातलं सोनं असतं. काही लोकांना भाजपानं पळवल, पण जे पळवलं ते पितळ होतं, खरं सोनं माझ्याकडेच आहे असे सांगत अमित शाह यांचे जोडे त्यांना लखलाभ होवोत असेही यावेळी बोलताना सांगितले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, आज सगळीकडे चिखल झाला आहे. मला कोणी तरी विचारत होतं दसरा मेळावा कुठे घेणार म्हणून मी सांगितलं की नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कवर, राज्यातला शेतकरी आज चिखलात असताना मी शिवसैनिक काही काळ चिखलात राहिलो तर काही वाटणार नाही असे सांगत पुढे बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, या सगळ्याकडच्या चिखला मागे कमळाबाई असून कमळाबाईने स्वतंच सगळं चांगलं करून घेतलं आणि लोकांच्या आयुष्याचा चिखल केला. शेतकऱ्यांची शेत जमिन वाहून गेली घरादारांमध्ये चिखल घुसला आहे. शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो तो विचारतो की आम्ही खायचं काय एवढ मोठं संकट आपण पाहिलेले नाही असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये येत असे. मी मुख्यमंत्री असताना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पहिल्या पाचमध्ये आलो होतो. पण ते काही माझे काही कतृत्व नव्हते ते सगळं तुमचा सहयोग होता असे स्पष्ट करत पण आताचे विद्यमान मुख्यमंत्री शेवटच्या स्थानी असल्याचे सांगत एका सर्व्हेक्षणातंर्गत जाहिर करण्यात आलेली माहितीही यावेळी दाखविली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचे मुख्यमंत्री बदलले आहेत, आपलं सरकार जेव्हा होतं तेंव्हा हेच बोंबलत होते की ओला दुष्काळ जाहिर करा. आता म्हणत आहेत की, ओला दुष्काळ अशी संज्ञाच नाही, खड्यात घाला तुमची संज्ञा पण शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत झालीच पाहिजे अशी मागणी करत आपलं सरकार असताना मी कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. कालबद्ध स्वरूपात ती पूर्णही केली. अजून यांनी २०१७ सालची कर्जमुक्ती करत आहेत. शेतकरी अजून वाट बघत आहे की ती कर्जमुक्ती कधी होणार, आपण शेतकऱ्यांना मदत करायला सुरुवात केली. पण गद्दारांनी आपल्या राशी पळवल्या अन सूरत आणि गुहावाटीला पळाले अशी खोचक टीकाही यावेळी केली.

सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून भाजपा-केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संघाला १०० वर्षे झाली. ही काही थोडी थोडकी वर्षे नाहीत. संघाच्या शंभरीला गांधी जयंती येणे हा काय योगायोग आहे का मला काही कळत नाही. जशी संघाला १०० वर्षे झाली आहेत तशी लढणारी माणसं कमी झाली आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी वाटचाल आणि नीती या सरकारची आहे अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचूक या माणसाने हाड मोडणाऱ्या कडाक्याच्या थंडीत आणि बर्फाळ प्रदेशात सौर ऊर्जेवर चालणारे तंबू बांधून सैनिकांना नीट नीटके राहता यावे म्हणून दिले. त्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष होऊ नये यासाठी आईस स्तुपाची योजना आणली. त्याने लेह-लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या न्याय मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी आंदोलन सुरु केले. त्यानंतर सगळंच पेटलं लेह-लडाखमध्ये सुरु झालं. परंतु मोदीबाबाने त्यांना उचलून रासुका खाली अटक केली आणि तुरुंगात टाकलं. मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते. पण आता त्यांना शिष्टमंडळामार्फत पाकिस्तानला गेले म्हणून देशद्रोही ठरवंल जात आहे अशी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मग ज्यांनी अचानक पणे शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खायला पाकिस्तानला गेले ते कोण, ज्या देशाच्या दहतशतवाद्यांनी धर्म विचारून भारतीयांना मारले त्याच देशाबरोबर आज हेच लोक क्रिकेट मॅच खेळत आहेत मग यांना काय म्हणालचं असा सवालही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *