सामाजिक

Iloveyou, sweetheart पासवर्डबाबत जाणून घ्या रंजक गोष्टी भारतीयांची पसंती या पासवर्डला

मुंबई: प्रतिनिधी आपण स्मार्टफोन, ई-मेल, सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग आदींसाठी पासवर्डचा वापर करतो. खूप पासवर्ड असल्यामुळे आपण सोपे पासवर्ड तयार करतो. या पासवर्डबाबतच रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक लोक ‘123456’ सारखे पासवर्ड सर्वात जास्त वापरतात असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण असं अजिबात होत नाही. भारतात सर्वात लोकप्रिय पासवर्ड ‘password’ …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवभक्त आणि पुणेकरांकडून अखेरचा निरोप वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने भारावून जात केवळ शिवचरित्राची माहिती प्रसारीत करण्याचे काम अखेरपर्यंत करत राहणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना शिवभक्त आणि पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली होती. …

Read More »

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारले जाणार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार १२ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, …

Read More »

आठवलेंच्या पाठराखण आणि वानखेडेंच्या दाव्याला आंबेडकरी संघटनांचा विरोध वानखेडे तुम्ही आंबेडकरवादी नाहीत, खोटा प्रचार करू नका

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यात गाजत असलेला समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीमध्ये हिंदू दलित समाजाचे कार्ड वापरून आज पुन्हा वानखेडे परिवाराने रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांची भेट घेवून आम्ही आंबेडकरीवादी आहोत, असे घोषित केले. परंतु एवढया दिवसात हे कुटुंब हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत …

Read More »

आयदानकार उर्मिला पवार यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार सम्यक साहित्य संसदच्यावतीने पुरस्कार जाहिर

मुंबईः प्रतिनिधी वाङमयीन परिवर्तनवादी चळवळीत अग्रेसर रहात, सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यक्रम करून मराठी वाङमयीन क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करणार्‍या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध लेखिका, आयदानकार उर्मिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. परिवर्तनवादी कवितेचे …

Read More »

अनुवादकांना संधी: मानधन तत्वावर मिळणार रोजगार भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अनुवादकांनी  आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज, नवी नोकरी मिळणार १ ऑक्टोंबरपासून मिळणार नवा नोकर

मुंबई: प्रतिनिधी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज सुरू करणार आहे. या एक्सचेंजद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे एक्सचेंज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल. देशात प्रथमच …

Read More »

बार्टीचे हे ९ विद्यार्थी यंदाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील ९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

आदिवासीबहुल ८ जिल्ह्यातील सुधारीत आरक्षणास राज्य सरकारची मंजूरी क व ड गटातील पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ८ आदीवासी बहुल जिल्ह्यात सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या क व ड वर्गातील रिक्त जागांसाठी राज्य सरकारने सुधारीत आरक्षण लागू केले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पूर्वी असलेल्या आरक्षणाच्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीतही बदल करण्यात आला आहे. यासंबधीचा सुधारीत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

बार्टीला दिला अखेर निधी; कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी …

Read More »